🍫🔥Sizzling Chocolate Brownie | सिझलिंग चॉकलेट ब्राउनी | घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी ब्राउनी
RecipeLogic
0:00 / 0:00
🍫🔥Sizzling Chocolate Brownie | सिझलिंग चॉकलेट ब्राउनी | घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी ब्राउनी
85 просмотров · 3 дня назад
RecipeLogic
436 подписчиков
85 просмотров · 3 дня назад
🍫🔥Sizzling Chocolate Brownie | सिझलिंग चॉकलेट ब्राउनी | घरच्या घरी रेस्टॉरंटसारखी ब्राउनी
नमस्कार मैत्रिणींनो!
आज आपण बनवणार आहोत अतिशय चॉकलेटी, मऊ आणि आतून फजसारखी सिझलिंग चॉकलेट ब्राउनी. गरमागरम ब्राउनीवर आईस्क्रीमचा स्कूप, चॉकलेट सॉस आणि थोडे नट्स घातल्यावर मिळणारी चुरचुरणारी सिझलिंग ब्राउनी अगदी रेस्टॉरंटसारखी तयार होते.
या रेसिपीमध्ये कुकरमध्ये ब्राउनी बनवण्याची पद्धत सांगितली आहे. तसेच, घरच्या घरी तयार केलेला चॉकलेट सॉस केक, ब्राउनी, आईस्क्रीम आणि इतर डेझर्टसाठीही वापरता येतो.
चॉकलेट सॉससाठी साहित्य
दूध – 1 कप
कॅस्टर शुगर किंवा पिठीसाखर – १½ कप
कोको पावडर – १/३ कप
मीठ – ¼ टीस्पून
डार्क चॉकलेट कंपाऊंड(morde)– 1/2 कप बारीक चिरलेले
बटर – ४ टेबलस्पून
व्हॅनिला इसेन्स – १ टीस्पून
1.चॉकलेट सॉस कृती
एका जाड बुडाच्या भांड्यात दूध आणि साखर घ्या.
मंद आचेवर साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
मिश्रणाला हलकी उकळी आली की गॅस बंद करा.
त्यामध्ये कोको पावडर आणि मीठ चाळून घाला. गुठळ्या होऊ नयेत म्हणून व्यवस्थित फेटा.
पुन्हा अगदी मंद आचेवर भांडे ठेवा.
त्यामध्ये चिरलेले डार्क चॉकलेट घालून पूर्णपणे वितळेपर्यंत ढवळा.
आता बटर थोडे थोडे घालून मिसळा. त्यामुळे सॉसला छान चमक आणि गुळगुळीतपणा येतो.
शेवटी व्हॅनिला इसेन्स घाला आणि मिसळा.
तयार चॉकलेट सॉस गरमागरम ब्राउनीवर ओतण्यासाठी वापरा.
ब्राउनीसाठी साहित्य
डार्क चॉकलेट कंपाऊंड(morde)– ½ कप
बटर – ४ टेबलस्पून
कॅस्टर शुगर किंवा पिठीसाखर – १ कप
व्हॅनिला इसेन्स – 1 टीस्पून
दही – १ कप
मैदा – ½ कप
कोको पावडर – ३ टेबलस्पून
मीठ – १ टीस्पून
2. ब्राउनी कृती
एका भांड्यात थोडे पाणी गरम करा. त्यावर उष्णता सहन करणारे दुसरे भांडे ठेवा.
वरच्या भांड्याचा तळ पाण्याला लागणार नाही याची काळजी घ्या.
त्यामध्ये बटर आणि डार्क चॉकलेट घालून पूर्णपणे वितळवा.
चॉकलेट वितळल्यानंतर भांडे गॅसवरून खाली घ्या.
त्यामध्ये साखर आणि व्हॅनिला इसेन्स घालून चांगले फेटा.
आता दही घालून साखर थोडी विरघळेपर्यंत मिश्रण फेटा.
मैदा, कोको पावडर आणि मीठ चाळून घाला.
स्पॅटुलाच्या मदतीने हलक्या हाताने मिश्रण एकजीव करा. जास्त वेळ ढवळू नका.
५ × ५ इंच ट्रेला बटर पेपर लावा आणि मिश्रण त्यामध्ये ओता.
ट्रे हलकेच टॅप करा, म्हणजे हवेचे मोठे बुडबुडे निघून जातील.
ट्रेमध्ये मिश्रण साधारण ८० टक्केच भरा.
३. प्रेशर कुकरमध्ये ब्राउनी बेक करण्याची कृती
कुकरमध्ये एक स्टँड ठेवा.
कुकरचे झाकण लावून हाय फ्लेमवर १० मिनिटे प्रीहीट करा.
कुकर गरम झाल्यावर झाकण उघडा आणि ब्राउनी ट्रे स्टँडवर काळजीपूर्वक ठेवा.
झाकण बंद करून लो ते मीडियम फ्लेमवर 25-30 मिनिटे बेक करा.
ब्राउनीच्या मध्यभागी टूथपिक घाला. ती स्वच्छ बाहेर आली तर ब्राउनी बेक झाली आहे.
४. ब्राउनी थंड करून कट करणे
ब्राउनी ट्रे बाहेर काढा आणि ब्राउनीला रूम टेम्परेचरवर पूर्णपणे थंड होऊ द्या.
थंड झाल्यावर ब्राउनी काळजीपूर्वक ट्रेमधून बाहेर काढा.
4 चौकोनी तुकडे करा.
तुमची चॉकलेट ब्राउनी तयार आहे! आता बनवूया आपली सिझलिंग ब्राउनी.
५. सिझलिंग ब्राउनी प्लेटिंग
सिझलर पॅन हाय फ्लेमवर स्मोकिंग हॉट होईपर्यंत गरम करा.
गरम झाल्यावर ब्राउनीचा एक तुकडा पॅनवर ठेवा.
*वरून गरम चॉकलेट सॉस ओता
त्यावर एक स्कूप आईस्क्रीम ठेवा.
वरून थोड गरम चॉकलेट सॉस ओता.
काही चिरलेले नट्स घाला.
तुमची सिझलिंग ब्राउनी तयार आहे! 🍫🔥🍨
रेसिपी लॉजिक | Recipe Logic
ब्राउनीला फज्डी टेक्सचर मिळण्यासाठी ओव्हरबेक करू नका. टूथपिकला थोडे ओलसर क्रम्ब्स लागले की ब्राउनी बाहेर काढा. पूर्ण थंड झाल्यावरच कापा, म्हणजे ती सॉफ्ट, रिच आणि फज्डी राहील.
महत्त्वाच्या टिप्स | Important Tips
कास्टर शुगर वापरा, कारण ती लवकर विरघळते.
डबल बॉयलरमध्ये पाणी बाऊलला लागणार नाही याची काळजी घ्या.
दही: ब्राउनीला मॉइश्चर आणि बाइंडिंग मिळण्यास मदत करते.
ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळणे: मैदा आणि कोको पावडरमधील गुठळ्या निघून जातात आणि फोल्ड करणे सोपे होते.
चॉकलेट सॉस बनवताना आच अगदी मंद ठेवा.
ड्राय इन्ग्रेडियंट्स घातल्यानंतर बॅटर जास्त मिक्स करू नका.
ब्राउनी पूर्ण थंड झाल्यावरच कट करा.
सिझलर पॅन चांगला गरम झाल्यावरच ब्राउनी ठेवा.
सॉस सर्व्ह करण्याच्या अगोदर गरम करून ओता.
फ्रिजमधील सॉस घट्ट झाला असेल तर हलका गरम करून मिक्स करा.
सिझलर पॅन हाताळताना काळजी घ्या, कारण तो खूप गरम असतो.
आईस्क्रीम आणि चॉकलेट सॉस घातल्यानंतर ब्राउनी लगेच सर्व्ह करा.
गरम सिझलर पॅन: गरम पॅनवर चॉकलेट सॉस ओतल्यामुळे सिझलिंग इफेक्ट मिळतो.
तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि RecipeLogic चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! ❤️
सिझलिंग ब्राउनी रेसिपी
घरगुती सिझलिंग ब्राउनी
चॉकलेट ब्राउनी रेसिपी
आईस्क्रीमसोबत ब्राउनी
एगलेस चॉकलेट ब्राउनी
प्रेशर कुकर ब्राउनी
ओव्हन ब्राउनी रेसिपी
होममेड चॉकलेट सॉस
चॉकलेट डेसर्ट रेसिपी
सिझलिंग ब्राउनी घरी
फजि ब्राउनी रेसिपी
व्हॅनिला आईस्क्रीम ब्राउनी
रेस्टॉरंट स्टाइल सिझलिंग ब्राउनी
सोपी ब्राउनी रेसिपी, चॉकलेट डेसर्ट
घरगुती ब्राउनी
सिझलर ब्राउनी.
#SizzlingBrownie
#सिझलिंगब्राउनी
#BrownieRecipe
#ChocolateBrownie
#HomemadeBrownie
#EgglessBrownie
#ChocolateSauce
#BrownieWithIceCream
#SizzlerBrownie
#DessertRecipe
#HomemadeDessert
#PressureCookerBrownie
#OvenBrownie
#ChocolateDessert
#RecipeLogic