Перейти к содержимому

बस ड्रायव्हरच्या घरात 28.5 कोटी 15 किलो सोनं | ₹28.5 Crore, 15 KG Gold Found in a Bus Driver’s House

Unseen Marathi

0:00 / 0:00

बस ड्रायव्हरच्या घरात 28.5 कोटी 15 किलो सोनं | ₹28.5 Crore, 15 KG Gold Found in a Bus Driver’s House

28 993 просмотра · 1 день назад
Unseen Marathi
107 тыс. подписчиков
28 993 просмотра · 1 день назад
जर मी तुम्हाला सांगितलं की एका घरात पोलिसांना कोट्यवधी रुपये सापडलेत… तर पहिला प्रश्न एवढे पैसे कोणाकडे सापडले, असा विचाराल. त्याचं उत्तरही एखादा मोठा उद्योगपती असेल, मोठा व्यापारी असेल, कुठल्या तरी बड्या व्यक्तीचं घर असेल असं वाटत असेल, तर थांबा… स्टोरी वेगळी आहे जरा. घर होतं एका माजी बस ड्रायव्हरचं. या प्रकरणात घर कोणाचं, याचं उत्तर जितकं इंटरेस्टिंग आहे, तितकीच इंटरेस्टिंग आहे पोलीस त्या घरापर्यंत कसे पोहोचले याची स्टोरी. मराठीत एक म्हण आहे, “शोधायला गेलो तुळस, अन् गवसला कळस”… असंच काहीसं या प्रकरणात घडलंय. कारवाई सुरू होती एका दरोड्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आणि हाताला लागली कोट्यवधी रुपयांची संशयित संपत्ती. कोट्यवधी म्हटल्यावर तुम्हाला एक-दोन कोटी वगैरे वाटेल… पण इथे गट्ठ्याच्या गट्ठे सापडलेत. पोलिसांनी पैसे मोजण्यासाठी मशीन आणल्या… आणि शेवटी आकडा आला 28 कोटी 50 लाख रुपये. संपलंय वाटेल… पण थांबा… ही तर फक्त सुरुवात होती. त्याच घरातून पोलिसांना आणखी एक गोष्ट सापडली… सोनं. तब्बल 15 किलो सोनं. त्याची किंमत सुमारे 21 ते 21.5 कोटी रुपये असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं जातंय. म्हणजे cash आणि gold मिळून आकडा 50 कोटींच्या वर जातोय. कोण आहे हा ड्रायव्हर? त्याच्याकडे इतका पैसा नेमका आला कसा? आणि काय आहे यामागची सगळी अनसीन स्टोरी… पाहुयात या व्हिडिओमधून.