महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! जुनोनीतील शेतकऱ्यांचा पाच एकर ऊस जळाला!
Jankranti25 News
0:00 / 0:00
महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह! जुनोनीतील शेतकऱ्यांचा पाच एकर ऊस जळाला!
266 просмотров · 8 дн. назад
Jankranti25 News
73 подписчика
266 просмотров · 8 дн. назад
महावितरणच्या दुर्लक्षाचा शेतकऱ्यांना फटका! जुनोनीत विजेच्या तारांमुळे उसाच्या शेताला आग; पाच एकर ऊस जळून खाक
आग लागण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी दिली होती लेखी तक्रार; वारंवार निवेदन देऊनही महावितरणकडून दखल न घेतल्याचा आरोप!
धाराशिव : महावितरणच्या कथित निष्काळजीपणाचा फटका जुनोनी येथील शेतकऱ्यांना बसला असून, विजेच्या तारांमधून ठिणग्या पडून उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत शेतकऱ्यांचा तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, ही दुर्घटना घडण्यापूर्वीच जुनोनी येथील शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाकडे वारंवार लेखी निवेदने देऊन विद्युत तारांमुळे निर्माण झालेल्या धोक्याची जाणीव करून दिली होती.
दि. २२ जानेवारी २०२६ रोजी श्रीकांत शिवाजी मुळे यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात गट क्रमांक २४ मधील विजेचा खांब वाकलेला असून विद्युत तारा खाली आल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. या तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून उसाच्या पिकाला आग लागण्याची शक्यताही व्यक्त केली होती.
त्यानंतर दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजीही जुनोनी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देऊन विद्युत तारा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती. उसाचे पीक, शेतातील वाळलेले गवत आणि विजेच्या तारांमधील घर्षण यामुळे आग लागण्याची भीती असल्याचेही निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते.
मात्र, शेतकऱ्यांनी वारंवार लेखी तक्रारी करूनही संबंधित विभागाने वेळीच दखल घेतली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अखेर ज्या धोक्याची पूर्वसूचना शेतकऱ्यांनी दिली होती, तशीच दुर्घटना घडली आणि पाच एकरांतील ऊस जळून खाक झाला.
शेतकरी वर्षभर कष्ट करून उसाचे पीक उभे करतात. मात्र, महावितरणच्या संभाव्य हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने योग्य आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
आता प्रश्न असा आहे की, शेतकऱ्यांनी दुर्घटनेपूर्वीच लेखी स्वरूपात धोक्याची सूचना दिलेली असताना महावितरणने वेळीच दुरुस्ती का केली नाही? आणखी किती शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर प्रशासन जागे होणार?