Перейти к содержимому

अखेर प्रचितगडाच्या महादरवाजाने घेतला मोकळा श्वास...प्रचितगड श्रमदान मोहीम | Prachitgad Sangameshwar

Kokankar Avinash

0:00 / 0:00

अखेर प्रचितगडाच्या महादरवाजाने घेतला मोकळा श्वास...प्रचितगड श्रमदान मोहीम | Prachitgad Sangameshwar

25 606 просмотров · 1 год назад
Kokankar Avinash
173 тыс. подписчиков
25 606 просмотров · 1 год назад
अखेर प्रचितगडाच्या महादरवाजाने घेतला मोकळा श्वास...प्रचितगड श्रमदान मोहीम | Prachitgad Sangameshwar #Prachitgad #PrachitgadTrek #प्रचितगड Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 25 & 26 Jan 2025 अखेर प्रचितगडाच्या महादरवाजाने घेतला मोकळा श्वास...! संगमरत्न फाउंडेशन आयोजित शनिवार रविवार दिनांक २५ आणि २६ जानेवारी २०२५ रोजी किल्ले प्रचितगडावर ४५ दुर्गप्रेमींसह प्रथमच श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती, गडकरी परिवार संस्थेचे मंडळी सुद्धा मोहिमेत उपस्थित होते. महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रारंभ केलेली " गड श्रमदान मोहीम " यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून किल्ल्यांच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत विविध संरक्षण उपाययोजना राबवण्यात आल्या. या मोहिमेत स्थानिक प्रशासन,स्थानिक मंडळ,इतिहास संशोधक, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, आणि स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे. 👉🏻श्रमदान मोहिमे दरम्यान करण्यात आलेली कामे ‣ पायथा गावातून गडाकडे जाणाऱ्या वाट दगडांवर रंगाने दिशादर्शक खुणा करण्यात आल्या. ‣ गडाचा मुख्य दरवाजा मधील माती आणि दगड बाजूला केले गेले. ‣ गडावरील वाढलेली झाडी झुडपे साफ कऱण्यात आली. ‣ गडावरील श्री भैरी भवानी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. ‣ गडावरील कातळ कोरीव खांब टाके जवळील परिसर साफ करण्यात आला. ‣ गडावरील वाटा झाडेझुडपे वेढलेल्या होत्या त्या मोकळ्या करण्यात आल्या. ▪️सह्याद्रीच रौद्रभीषण रुप अनुभवायच असेल तर प्रचितगड किल्ल्यावर एकदा तरी जायलाच पाहिजे . किल्ल्यावर जाताना लागणार घनदाट जंगल, ७० ते ८० अंशात चढणारी दमछाक करणारी घसरडी पाउलवाट , अडचणीच्या जागी लावलेल्या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात. या मोहिमेत मुख्य काम पूर्ण गेले ते म्हणजे पूर्णतः मातीखाली गेलेला गडाचा दरवाजा.खिंडी मधून शिडी वापर करून गडाकडे येताना कातळात कोरलेल्या १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात.दरवाजाची कमान अस्तित्वात दिसत नसली तरी कमान ज्या खांबांवर उभी होती ते खांब आहेत.दरवाजा उत्तराभिमुख असून दरवाजावर शिल्पकाम होते की नाही हे समजून येत नाही. दरवाजा जवळ जवळ ५-६ फूट दगड माती खाली गेला होता.त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्यात आली.हळू हळू एक एक पायरी मोकळी होऊ लागली,बघता बघता दरवाजा मोकळा होऊ लागला,हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, ▪️रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील किल्ला,महाराणी येसूबाई याच्या शृंगारपूर गावाजवळून ५४० मी. उंचीवर आहे.प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला दिसतो. सूर्यराव सुर्वे हे संगमेश्वर व शृंगारपूर या भागाचे आदिलशाहाचे सरदार होते. त्यांच्या अंमलाखाली शृंगारपूर व प्रचितगड होता. छ. शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६१ मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्यावर स्वारी करून प्रतिचगड जिंकून घेतला. छ. शिवाजी महाराजांनी प्रचितगड घेतल्याचे उल्लेख शिवभारत, जेधे शकावली व शिवचरित्र प्रदीप या ग्रंथांमधे येतात. परंतु सभासद बखरीमध्ये छ. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रचितगडचे नाव येते. याचा अर्थ असा की, किल्ला महाराजांनी बांधला; परंतु काही काळ तो सुर्व्यांकडे होता व नंतर परत महाराजांनी तो घेतला. छ. संभाजी महाराजांच्या काळात प्रचितगड हा स्वराज्यातच होता, कारण छ. संभाजी महाराजांचा मुक्काम प्रचितगडच्या पायथ्याशी असलेल्या शृंगारपूरमध्ये अनेक वेळा झालेला होता. किल्ल्यांवरील वास्तू व इतर अवशेष पाहून किल्ला कधीच मोगलांकडे किंवा मुस्लिम सत्ताधीशांकडे गेला नसावा. मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून घेतला (१८१८). किल्ला जिंकल्यावर तो पाडल्याचे उल्लेख येतात; परंतु किल्ला न पाडता किल्ल्यावर जाणारे रस्ते सुरुंग लावून उडविण्यात आले. __________________________________________________________________________________ Check my Vlog / Shoot Accessories :- Canon Mirrorless Camera : https://amzn.to/49Etxb8 Action Cameras : GoPro Hero11 Waterproof : https://amzn.to/3DeEALR Gopro Hero12 Waterproof : https://amzn.to/4gbVHwy ASUS TUF Gaming F17 : https://amzn.to/3ZCcuSc Suggestions :- Panasonic Camcorder : https://amzn.to/3BuKYy1 Sony Digital Camera ZV-1 : https://amzn.to/3ZxTjcg __________________________________________________________________________________ Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com __________________________________________________________________________________ For New Jobs Update Join Today. Facebook Group - Join now for Jobs Update.   / fasttrackjobsofficial   Whatsapp Channel - Join Now for Jobs Update https://whatsapp.com/channel/0029VagI... __________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel :    / @recipeskatta   Entertainment Katta :    / @entertainmentkatta   WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w... Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook :   / kokankaravinash   Instagram :   / kokankaravinash