Перейти к содержимому

Manoj Jarange Patil | जरांगेंभोवती नवं वादळ? कटारेंना ५ कोटींचा दंड, डिफेंडर मालकाच्या दुकानावर धाड

0:00 / 0:00

Manoj Jarange Patil | जरांगेंभोवती नवं वादळ? कटारेंना ५ कोटींचा दंड, डिफेंडर मालकाच्या दुकानावर धाड

12869
12869
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे केंद्र राहिलेल्या जालन्यातून सध्या एक महत्त्वाची आणि चर्चेत असलेली बातमी समोर आली आहे. जरांगे यांच्या कोअर कमिटीतील सदस्य संजय कटारे यांच्यावर अवैध वाळू उत्खनन प्रकरणात तब्बल ४ कोटी ९० लाख रुपयांचा दंड पुन्हा कायम करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कटारे यांच्याभोवतीच्या आर्थिक व्यवहारांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यात वापरली गेलेली कोट्यवधी रुपयांची डिफेंडर गाडी आणि तिचे मालक सुभाष भोसले यांचं नावही चर्चेत आलं आहे. नेमका संजय कटारे यांच्यावरील जवळपास ५ कोटी रुपयांचा दंड पुन्हा का कायम करण्यात आला? अवैध वाळू उत्खनन प्रकरण नेमकं काय आहे? जरांगे यांच्या दौऱ्यात वापरल्या गेलेल्या डिफेंडर गाडीचा मालक सुभाष भोसले कोण आहेत? आणि या संपूर्ण प्रकरणात जरांगे समर्थकांभोवती चर्चेत आलेल्या या घडामोडींचं नेमकं कनेक्शन काय? या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. #ManojJarangePatil #SanjayKatare #SubhashBhosale #Jalna #MarathaReservation #JarangePatil #MaharashtraNews #SandMining #IllegalSandMining #DefenderCar #MarathaAndolan #मराठाआरक्षण #मनोजजरांगेपाटील #जालना #आझादमराठी