१५०० कोटींची संपत्ती ते हजारो एकरची शेती, Walmik Karad च्या संपत्तीवरुन कोणते आरोप होतायत ?
BolBhidu
0:00 / 0:00
१५०० कोटींची संपत्ती ते हजारो एकरची शेती, Walmik Karad च्या संपत्तीवरुन कोणते आरोप होतायत ?
314 466 просмотров · 1 г. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
314 466 просмотров · 1 г. назад
#BolBhidu #SureshDhas #WalmikKarad
वाल्मिक कराड. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम करणारा एक सर्वसाधारण पोऱ्या. मुंडेंचंच बोट धरुन बीडमधल्या परळीत नावारुपाला आला आणि आज राज्यभरात चर्चेचा विषय झाला. अवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन त्याच्यावर होणारे आरोप यामुळं वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रात गाजतंय. पण परळीत सुरुवातीपासूनच हे नाव कायम चर्चेत असायचं. मग ते त्याच्या दहशतीमुळं असो किंवा त्यानं कमवलेल्या संपत्तीमुळं.
सध्या अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या जमिनी असल्याचे आरोप होतायत. गेल्या पाच वर्षांत तर कराडची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जातंय. कराडला दोन महिन्यांपूर्वीच ईडीनं नोटीस पाठवलीय, कराड हा दीड हजार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय. त्यामुळं कधीकाळी गोपीनाथ मुंडेंचा घरी काम करणाऱ्या वाल्मिक कराडचं प्रस्थ किती वाढलं, कराडच्या प्रॉपर्टी संबंधात नेमके काय आरोप होतायत? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/