Перейти к содержимому

दाबलेली वाफ अखेर आली बाहेर ! शिंदे विरुद्ध फडणवीस वादात नवी ठिणगी ! आता लपून छपून नाही, थेट उघड उघड

SHODH NEWS MARATHI

0:00 / 0:00

दाबलेली वाफ अखेर आली बाहेर ! शिंदे विरुद्ध फडणवीस वादात नवी ठिणगी ! आता लपून छपून नाही, थेट उघड उघड

14 069 просмотров · 3 дня назад
SHODH NEWS MARATHI
62,6 тыс. подписчиков
14 069 просмотров · 3 дня назад
#maharashtrapolitics #shivsenacrisis #marathibatmya #abpnews #abpmajha #pudharinews #maharashtratimes #loksatta #pudharinews #ajitpawar #mahayuti #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #ncpmaharashtra #shodhnewsmarathi #ashokgodage #uddhavthackeray #rajthackeray #marathinews18 #tv9marathi #samaná #sanjayraut #congress #bjp #shivsena #pandharpurpolitics #solapurpolitics #dhananjaymunde दबलेली वाफ अखेर आली बाहेर ! शिंदे विरुद्ध फडणवीस वादात नवी ठिणगी ! आता लपून छपून नाही, थेट उघड उघड वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करणारे काही नेते शिंदे गटातही आहेत.. त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड... हो तेच ते संजय गायकवाड... शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना फोन करून धमक्या देणारे... त्यांच्या पत्नी आई विषयी घाणेरडे शब्द वापरणारे.... तेच ते ज्यांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये लुंगी बनियान वर जाऊन वेटरला मारहाण केली होती.... आता पुन्हा हे संजय गायकवाड एका नव्या वादात सापडले आहेत... बाईच्या शरीराविषयी त्यांनी केलेलं वक्तव्य आता त्यांच्या अंगलट आलं आहे... भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटातील बुलढाणा जिल्ह्यातील अंतर्गत राजकीय संघर्षातून निर्माण झालेला वाद आता पोलिसांच्या दारी पोहोचला शिंदे गटाच्या या आमदारावर अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला... भाजपाच्या आमदार श्वेता महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यात राजकीय वाद आहेत... विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं... यावेळी बाप तो बाप रहेगा हे गाणं मोठ्या आवाजात वाजवलं गेलं... त्यावर हे आमदार संजय गायकवाड रिऍक्ट झाले बाप तो बाप है' हे विधान पुरुषाने केले तर ठीक आहे, मात्र एखाद्या महिलेने 'बाप तो बाप आहे' असे म्हटल्यास 'बापाचं शरीर आणणार कुठून?' असा सवाल त्यांनी केला.... आणि इथेच ते फसले.... त्यांच्या या वक्तव्यामुळे, महिलांच्या सन्मानाला आणि लज्जेला धक्का पोहोचल्याचा आरोप करत, 42 वर्षे वयाच्या एका महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीची दखल घेत बुलढाणा पोलिसांनी, भारतीय न्याय संहितेच्या कलम 79 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे... पुण्यातही एका महिलेने अशाच पद्धतीची एक तक्रार केली होती... अर्ध्या रात्री एफ आय आर नोंदवून मंत्र्यावर टीका करणाऱ्या संतोष पंडित यांना अर्ध्या रात्री अटकही करण्यात आली होती.... पुण्यात संतोष पंडित यांनी महिलेविषयी बोलण्यावरून, गुन्हा दाखल झाला होता. मध्यरात्री 12.38 मिनिटाने गुन्हा दाखल झाला होता. दीड वाजता त्यांना अटक केली होती. संजय गायकवाडांविरोधात देखील त्याचपद्धतीने गुन्हा दाखल आहे, त्यापद्धतीने आमदार गायकवाड यांनाही अटक झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली.... आपल्यावर दाखल करण्यात आलेला विनयभंगाचा गुन्हा पूर्णपणे खोटा असल्याचा दावा आमदार संजय गायकवाड () यांनी केला आहे. पण हे सांगत असताना त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे असणाऱ्या गृह खात्याकडं बोट दाखवलं आहे.... एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तर अंतर्गत कुरघोड्यांचं राजकारण नेहमीच चालत असतं....... एकमेकांना अडवू जाण्याची एक संधीही सोडली जात नाही... फक्त जाहीररीत्या कोण कुणाबद्दल काही बोलत नाही... शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मात्र आता थेट मुख्यमंत्री कार्यालयालाच या नव्या वादात ओढलं आहे..... गृह मंत्रालय फडणवीस यांच्याकडं आहे, गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप करीत अप्रत्यक्षपणे फडणवीस यांच्याच कारभाराकडं बोट दाखवलं.... पण त्याही पुढं जाऊन त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील पोलिस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय संघर्षाची किनार मिळाली आहे.... मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयातून आपल्या विरुद्ध सुत्रे हलली.. आणि त्यामुळेच आपल्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असंच त्यांनी प्रत्यक्षाप्रत्यक्ष सुचवलं आहे...... विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर गायकवाड यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि फडणवीसांवर केलेले आरोप यामुळे हा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी कायदेशीर कारवाईचा वापर होत असल्याची चर्चा तर बुलढाणा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातही सुरू झालेलीच आहे.... शिंदे गोट आणि फडणवीस यांच्यातला छुपा संघर्ष आता उघडपणे होणार असल्याचे संकेत त्यामुळे स्पष्ट झाले आहेत.... शेवटी वाफ कितीही कोंडण्याचा प्रयत्न केला तरी ती बाहेर पडतच असते...