Перейти к содержимому

ज्वार के आटे की कुरकुरी सेव | बिना बेसन दिवाली स्पेशल

Aai Chya Haatcha

0:00 / 0:00

ज्वार के आटे की कुरकुरी सेव | बिना बेसन दिवाली स्पेशल

166 просмотров · 6 дн. назад
Aai Chya Haatcha
143 подписчика
166 просмотров · 6 дн. назад
दिवाळीचा फराळ म्हटलं की चकली, शेव, लाडू आणि शंकरपाळी तर आलीच! पण यंदा नेहमीच्या फराळात थोडा बदल करून काहीतरी वेगळं बनवूया. आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत शेव! तोही बेसन, मैदा किंवा गव्हाचं पीठ अजिबात न वापरता. या रेसिपीमध्ये ज्वारीचं पीठ, आलं-लसूण, ओवा आणि मसाले वापरून छान चविष्ट शेव बनवणार आहोत. साहित्य ज्वारीचं पीठ – १ मोठा कप पाणी – २ छोटे कप मीठ – चवीनुसार गरम मसाला – थोडासा हळद – थोडीशी आलं-लसणाची पेस्ट – १ टेबलस्पून ओवा – चवीनुसार तेल – तळण्यासाठी कृती १. मसाल्याचं पाणी तयार करा एका भांड्यात दोन छोटे कप पाणी उकळून घ्या. त्यात मीठ, गरम मसाला, हळद, आलं-लसणाची पेस्ट आणि ओवा घालून छान ढवळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. २. पीठ मळून घ्या आता या मिश्रणात ज्वारीचं पीठ घालून सगळं एकजीव करा. भांड्यावर झाकण ठेवून वाफ कमी होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर छान घट्ट आणि एकसंध पीठ मळून घ्या. ३. शेव तयार करा शेव पाडण्याच्या साच्याला आतून थोडंसं तेल लावा आणि त्यात तयार पीठ भरा. कढईत तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर साच्यातून गोलाकार शेव पाडून मध्यम आचेवर साधारण ५ ते ७ मिनिटं, दोन्ही बाजूंनी खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या. थेट तेलात शेव पाडता येत नसेल, तर आधी ताटात शेव पाडून मग सावधपणे तेलात सोडा. आणि बघा, आपला ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत शेव तयार आहे! या दिवाळीत हा वेगळा फराळ नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा आणि अशाच आणखी दिवाळी फराळाच्या रेसिपीसाठी आपल्या आईचा हातचं चॅनेलला सबस्क्राइब करा! @AaiChyaHaatcha_Official #ज्वारीचाशेव #दिवाळीफराळ #JowarSev #SevRecipe #DiwaliSnacks