अस्सल कोकणी शिरवळे आणि नारळाचा रस | पारंपरिक मराठी रेसिपी
Aai Chya Haatcha
0:00 / 0:00
अस्सल कोकणी शिरवळे आणि नारळाचा रस | पारंपरिक मराठी रेसिपी
223 просмотра · 3 недели назад
Aai Chya Haatcha
110 подписчиков
223 просмотра · 3 недели назад
मराठी 🇮🇳
आज आपण बनवणार आहोत अस्सल कोकणी शिरवळे आणि गोड नारळाचा रस. शिरवळे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ असून अनेक मराठी आणि कोकणी घरांमध्ये आवडीने बनवला जातो.
सर्वप्रथम नारळाचा रस तयार करूया. मिक्सरमध्ये थोडी हळद, ओलं खोबरं आणि किसलेला गूळ घालून व्यवस्थित वाटून घ्या. त्यात चार छोटे कप पाणी घाला आणि पुन्हा चांगलं मिसळा. हे मिश्रण बारीक कापडातून गाळून नारळाचा गोड रस काढून घ्या. त्यात वेलची, जायफळ आणि चवीनुसार थोडं मीठ घालून व्यवस्थित मिसळा.
शिरवळ्यांसाठी एका पातेल्यात दोन कप पाणी गरम करा. त्यात थोडं मीठ घालून उकळी आणा. पाणी उकळल्यावर एक कप तांदळाचं पीठ घालून काळजीपूर्वक आणि व्यवस्थित मिसळा.
पीठ तयार झाल्यावर त्याचे मोठे लांबट गोळे बनवा आणि उकळत्या पाण्यात सोडा. गोळे पाण्यावर तरंगायला लागले की ते शिजले आहेत.
पारंपरिकपणे शिरवळ्यांसाठी खास मोठा साचा वापरला जातो. आमच्याकडे तो नसल्यामुळे आम्ही चकली आणि शेव बनवण्याचा साचा वापरला आहे. साच्याला थोडं तेल लावून त्यात गरम गोळे भरा आणि केळीच्या पानावर सुंदर शिरवळे पाडा.
आणि तयार आहेत आपले पारंपरिक कोकणी शिरवळे आणि गोड नारळाचा रस!
हिंदी 🇮🇳
आज हम बना रहे हैं Authentic Konkani Shirvale और मीठा नारियल का रस. शिरवळे कोंकण और महाराष्ट्र के कई घरों में बनाई जाने वाली एक पारंपरिक रेसिपी है।
सबसे पहले नारियल का रस तैयार करें। मिक्सर में थोड़ी हल्दी, ताजा कद्दूकस किया हुआ नारियल और कद्दूकस किया हुआ गुड़ डालकर अच्छी तरह पीस लें। इसमें चार छोटे कप पानी डालें और अच्छी तरह मिलाएं। अब इसे बारीक कपड़े से छानकर नारियल का मीठा रस निकाल लें। इसमें इलायची, जायफल और स्वादानुसार थोड़ा नमक डालकर अच्छी तरह मिलाएं।
शिरवळे बनाने के लिए एक बर्तन में दो कप पानी गर्म करें। थोड़ा नमक डालें और पानी को उबलने दें। पानी उबलने के बाद एक कप चावल का आटा डालकर अच्छी तरह मिलाएं।
आटा तैयार होने के बाद इसके बड़े लंबे गोले बनाएं और उबलते पानी में डालें। जब ये गोले पानी के ऊपर तैरने लगें, तब समझिए कि वे अच्छी तरह पक गए हैं।
पारंपरिक रूप से शिरवळे बनाने के लिए एक खास बड़ा सांचा इस्तेमाल किया जाता है। हमारे पास वह नहीं था, इसलिए हमने चकली और सेव बनाने वाला सांचा इस्तेमाल किया है। सांचे में थोड़ा तेल लगाकर गर्म आटा भरें और केले के पत्ते पर शिरवळे तैयार करें।
बस, पारंपरिक Konkani Shirvale और Coconut Ras तैयार है!
English 🇮🇳
Today we are making authentic Konkani Shirvale with sweet coconut ras, a traditional dish enjoyed in many Marathi and Konkani households.
First, prepare the coconut ras. Add a little turmeric, freshly grated coconut and grated jaggery to a mixer and blend well. Add four small cups of water and mix again. Strain the mixture through a fine cloth to extract the sweet coconut ras. Add cardamom, nutmeg and a little salt to taste, then mix well.
For the Shirvale, heat two cups of water in a vessel. Add a little salt and bring it to a boil. Once the water boils, add one cup of rice flour and mix carefully until the dough comes together.
Shape the prepared dough into large cylindrical pieces and place them in boiling water. Once they begin to float on the surface, they are properly cooked.
Traditionally, Shirvale is shaped using a large special press. Since we did not have the traditional press, we used a regular chakli and sev maker. Lightly oil the press, fill it with the cooked rice dough and press out the Shirvale onto a fresh banana leaf.
Serve the freshly made Shirvale with sweet coconut ras and enjoy this beautiful traditional Konkani recipe.
#Shirvale #ShirvaleRecipe #KonkaniRecipe #KonkaniFood #MarathiRecipe #MaharashtrianFood #KokanRecipe #TraditionalRecipe #RiceFlourRecipe #CoconutRecipe