Перейти к содержимому

Rishi Panchami Special | Traditional Maharashtrian Rushichi Bhaji

Aai Chya Haatcha

0:00 / 0:00

Rishi Panchami Special | Traditional Maharashtrian Rushichi Bhaji

2 627 просмотров · 2 недели назад
Aai Chya Haatcha
111 подписчиков
2 627 просмотров · 2 недели назад
ऋषीपंचमीच्या दिवशी अनेक मराठी आणि कोकणी घरांमध्ये आवर्जून बनवला जाणारा एक खास पारंपरिक पदार्थ म्हणजे ऋषीची भाजी. अनेक वेगवेगळ्या भाज्या एकत्र शिजवून बनणाऱ्या या भाजीची खासियत म्हणजे प्रत्येक घरात तिची पद्धत थोडी वेगळी असते. आमच्या घरातही ही भाजी अनेक वर्षांपासून एका खास पद्धतीने बनवली जाते. आजच्या ऋषीच्या भाजीसाठी आपण अळू आणि अळूचे देठ, मटार, भेंडी, कणीस, मिरची, खोबरं, केळं, गाजर, काकडी, मेथी, रताळं, दोडका, लाल भोपळा, आंबाडी, दुधी भोपळा आणि लाल माठ अशा भरपूर भाज्या घेतल्या आहेत. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून आपल्या आवडीनुसार चिरून घ्यायच्या. ऋषीच्या भाजीत पारंपरिकपणे कांदा वापरला जात नाही. पण आमच्या घरात अनेक वर्षांपासून कांदा घालून ही भाजी बनवली जाते, त्यामुळे आज आपण आमच्या घरची पद्धत दाखवत आहोत. एका टोपात थोडं तेल गरम करून त्यात जिरं घाला. त्यानंतर चिरलेला कांदा घालून छान परतून घ्या. कांदा परतला की त्यात मिरचीची पेस्ट घालून व्यवस्थित मिसळा. आता ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ लागतो त्या आधी घालायच्या. सगळ्यात आधी गाजर, त्यानंतर रताळं, आंबाडी आणि अळूचे देठ घालून सगळं व्यवस्थित मिसळा. टोपावर झाकण ठेवून या भाज्या साधारण १० मिनिटं शिजू द्या. यानंतर थोडासा मसाला घाला आणि उरलेल्या सगळ्या भाज्या एकामागोमाग एक टोपात घाला. सगळ्या भाज्या घातल्यानंतर साधारण दोन कप पाणी घालून सगळं छान मिसळा. मध्यम आचेवर पुन्हा साधारण १० मिनिटं शिजू द्या. भाज्या पूर्णपणे शिजल्या आहेत की नाही हे एकदा तपासून घ्या. सगळ्या भाज्या छान शिजल्या की शेवटी त्यात ओलं खोबरं किसून घाला आणि सगळं एकदा व्यवस्थित मिसळून घ्या. आणि आपली भरपूर भाज्यांनी भरलेली, घरच्या पद्धतीची ऋषीची भाजी तयार आहे. गणेशोत्सव आणि ऋषीपंचमीच्या दिवसांशी जोडलेली ही साधी भाजी म्हणजे आपल्या घरच्या जुन्या चवींची आणि परंपरेची आठवण आहे. तुमच्या घरी ऋषीची भाजी कशी बनवतात? कोणत्या भाज्या वापरतात? तुमच्या घरची खास पद्धत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर आपल्या घरच्यांसोबत शेअर करा आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपीसाठी चॅनेलला नक्की Subscribe करा. #ऋषीचीभाजी #ऋषीपंचमी #RushichiBhaji #RishiPanchami #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #GanpatiSpecial #Ganeshotsav