Перейти к содержимому

चमचमीत ड्राय प्रॉन्स / कोळंबी भाजी 😋🔥 | Dry Prawns Recipe in Marathi | झणझणीत कोळंबी रेसिपी

Rohini’s Vloging and Recipes

0:00 / 0:00

चमचमीत ड्राय प्रॉन्स / कोळंबी भाजी 😋🔥 | Dry Prawns Recipe in Marathi | झणझणीत कोळंबी रेसिपी

111 просмотров · 6 дн. назад
Rohini’s Vloging and Recipes
140 подписчиков
111 просмотров · 6 дн. назад
🍤 चमचमीत Dry Prawns / कोळंबी भाजी 📝 साहित्य कोळंबी – १ मोठा बाऊल कांदे – २ मोठे, बारीक चिरलेले टोमॅटो – २, बारीक चिरलेले व बिया काढलेले जिरे – १ चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर – १ चमचा गरम मसाला – १ चमचा घरचा काळा मसाला – १ चमचा हळद – ½ चमचा लसूण – १०–१५ पाकळ्या, ठेचलेल्या आलं – ½ इंच, किसलेलं चिंच – १ मोठी वाटी/गोळी तेल – आवश्यकतेनुसार मीठ – चवीनुसार कोथिंबीर – गार्निशिंगसाठी लिंबू – ½ कोळंबी स्वच्छ करण्यासाठी थोडं पाणी 👩‍🍳 कृती 1. सर्वप्रथम कोळंबी ४–५ वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. 2. कोळंबीमध्ये १ चमचा हळद, १ चमचा मीठ आणि ½ लिंबाचा रस घालून हाताने चांगलं चोळून घ्यावं. त्यामध्ये थोडं पाणी घालून झाकण ठेवावं आणि अर्धा तास बाजूला ठेवावं. यामुळे कोळंबीचा वास कमी होतो. 3. तोपर्यंत दोन कांदे बारीक चिरून घ्यावेत. दोन टोमॅटो चिरून त्यातील बिया काढून घ्याव्यात. 4. लसूण ठेचून घ्यावा आणि साधारण ½ इंच आलं किसून घ्यावं. 5. चिंच गरम पाण्यात एका वाटीत भिजत ठेवावी आणि नंतर तिचा कोळ काढून घ्यावा. 6. आता कढई गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करावं. तेल गरम झाल्यावर जिरे घालावं. 7. त्यानंतर ठेचलेला लसूण आणि किसलेलं आलं घालून छान परतून घ्यावं. 8. आता बारीक चिरलेला कांदा घालून तो गुलाबीसर होईपर्यंत परतावा. 9. कांदा गुलाबी झाला की त्यात चिरलेले टोमॅटो घालावेत. टोमॅटो मऊ होऊन त्यातून थोडं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यावं. मिश्रण खूप कोरडं वाटत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालू शकता. 10. आता काश्मिरी लाल मिरची, गरम मसाला, घरचा काळा मसाला आणि हळद घालून मसाला चांगला परतावा. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं. 11. आता अर्धा तास ठेवलेली कोळंबी पाण्यातून काढून स्वच्छ धुऊन घ्यावी आणि कढईमध्ये घालावी. 12. चवीनुसार थोडं मीठ घालावं आणि तयार केलेला चिंचेचा कोळ घालावा. 13. वेगळं पाणी अजिबात घालायचं नाही. चिंचेच्या कोळामधील पाण्यातच कोळंबी शिजू द्यायची. 14. झाकण ठेवून मंद आचेवर साधारण १०–१५ मिनिटं वाफवून घ्यावं. 15. शेवटी वरून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 😋 तयार आहे! गरमागरम, झणझणीत आणि चमचमीत Dry Prawns / कोळंबी भाजी! 🍤❤️ #DryPrawns #PrawnsRecipe #Kolambi #KolambiBhaji #DryKolambi #KolambiFry #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #SeafoodRecipe #SpicyPrawns #कोळंबी #कोळंबीभाजी #मराठीरेसिपी