Перейти к содержимому

👉🏻"फक्त २ मुख्य साहित्य वापरून बनवा खमंग खुसखुशीत चकली | भाजणीची झंझट नाही | झटपट चकली रेसिपी”

Rohini’s Vloging and Recipes

0:00 / 0:00

👉🏻"फक्त २ मुख्य साहित्य वापरून बनवा खमंग खुसखुशीत चकली | भाजणीची झंझट नाही | झटपट चकली रेसिपी”

34 просмотра · 19 ч назад
Rohini’s Vloging and Recipes
139 подписчиков
34 просмотра · 19 ч назад
"फक्त २ मुख्य साहित्य वापरून बनवा खमंग खुसखुशीत चकली | भाजणीची झंझट नाही | झटपट चकली रेसिपी" साहित्य मुख्य दोन साहित्य: १ वाटी भाजलेली डाळ (डाळवं / फुटाण्याची डाळ) ४ वाट्या तांदळाचे पीठ इतर साहित्य: 3. ४ चमचे ओवा 4. ८ चमचे पांढरे तीळ 5. २ चमचे लाल तिखट 6. अर्धा चमचा हळद 7. चवीनुसार मीठ 8. अर्धी वाटी तेल (मोहनसाठी) 9. गरम पाणी (पीठ मळण्यासाठी) 10. चकल्या तळण्यासाठी तेल कृती 1. सर्वप्रथम भाजलेली डाळ मंद आचेवर थोडी भाजून घ्यावी. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. 2. वाटलेली डाळ चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यावी. 3. ज्या वाटीने डाळ मोजली आहे, त्याच वाटीने चार वाट्या तांदळाचे पीठ मोजून घ्यावे आणि तेही चाळून घ्यावे. 4. आता एका मोठ्या परातीत चाळलेली डाळ आणि तांदळाचे पीठ एकत्र करावे. 5. त्यामध्ये लाल तिखट, हळद, ओवा, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. 6. अर्धी वाटी तेल कडकडीत गरम करून या मिश्रणात घालावे. तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यावे. 7. आता एका पातेल्यात पाणी कडकडीत गरम करून घ्यावे. हे गरम पाणी पिठामध्ये थोडे थोडे घालावे. सुरुवातीला हात न लावता चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करावे. 8. पीठ घट्टसर ठेवावे. जास्त पाणी घालू नये. त्यानंतर पिठावर झाकण ठेवून १५ मिनिटे बाजूला ठेवावे. 9. १५ मिनिटांनंतर पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घ्यावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून पीठ मऊसर करून घ्यावे. 10. आता चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून आपल्या आवडीच्या आकाराच्या चकल्या पाडून घ्याव्यात. 11. कढईमध्ये तेल गरम करावे. चकल्या तेलात सोडताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवावा आणि नंतर मध्यम आचेवर चकल्या सोनेरी लालसर होईपर्यंत तळून घ्याव्यात. 12. तयार झालेल्या चकल्या ताटात काढून घ्याव्यात. तयार आहेत खमंग, खुसखुशीत चकल्या! भाजणी करण्याची अजिबात झंझट नाही, कमी मेहनतीत आणि झटपट तयार होणाऱ्या या चकल्या चवीला अप्रतिम लागतात. योग्य प्रकारे साठवून ठेवल्यास महिनाभर टिकतात.