🌼 दिवाळीसाठी फक्त ४ चमचे तेलात बनवा हेल्दी, कुरकुरीत पोहे चिवडा! Diet pohe chivada/ healthy snak😍👌🏻
Rohini’s Vloging and Recipes
0:00 / 0:00
🌼 दिवाळीसाठी फक्त ४ चमचे तेलात बनवा हेल्दी, कुरकुरीत पोहे चिवडा! Diet pohe chivada/ healthy snak😍👌🏻
99 просмотров · 2 дн. назад
Rohini’s Vloging and Recipes
141 подписчик
99 просмотров · 2 дн. назад
🌼 दिवाळीसाठी फक्त ४ चमचे तेलात बनवा हेल्दी, कुरकुरीत पोहे चिवडा! 🌼
कमी तेलात • न तळता • झटपट आणि स्वादिष्ट
🥣 साहित्य
1. जाड पोहे – अर्धा किलो (५०० ग्रॅम)
2. शेंगदाणे – १ वाटी
३. हिरव्या मिरच्या – ५ ते ६
4. जिरे – १ चमचा
5. कढीपत्ता – आवश्यकतेनुसार
6. हळद – अर्धा चमचा
7. तेल – एकूण ४ चमचे
8. मीठ – चवीनुसार
9. कोथिंबीर – चवीनुसार
ह
👩🍳 कृती
1. सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून गरम करा. त्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून मंद आचेवर कोरडे भाजून घ्या. पोहे भाजताना तेलाचा वापर करायचा नाही. त्यामुळे पोहे छान कुरकुरीत होतात.
2. सर्व पोहे थोडे थोडे करून भाजून घ्या आणि एका बाजूला काढून ठेवा.
3. आता त्याच कढईमध्ये एकूण ४ चमचे तेलापैकी थोडे तेल गरम करा.
4. त्यामध्ये जिरे, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून छान परतून घ्या.
5. त्यानंतर शेंगदाणे घालून ते कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
6. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा.
7. भाजून ठेवलेले पोहे घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका.
8. सर्व मिश्रण व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्या.
9. मंद आचेवर साधारण ५ मिनिटे सतत उलटपालट करत भाजून घ्या.
10. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि मस्त मिक्स करा.
😋 आपला हेल्दी कुरकुरीत पोहे चिवडा तयार!
अगदी कमी तेलात, पोहे न तळता बनवलेला हा चविष्ट चिवडा दिवाळीच्या फराळासाठी नक्की करून पाहा.
#पोहेचिवडा #दिवाळीफराळ #हेल्दीचिवडा #डायटचिवडा #कुरकुरीतचिवडा #मराठीरेसिपी #दिवाळीरेसिपी #पोहेरेसिपी #HealthyChivda #diwalispecial #youtubeshorts #viralvideo #marathifood #marathirecipe #maharashtrianrecipes #breakfastrecipe #maharashtrianrecipe #indianfood #marathirecipes #घरगुतीरेसिपी