Vidhan Parishad Result वरुन BJP-Shivsena मध्ये जुंपली,पराभवावरुन महायुतीत ब्लेम गेम कसा सुरु झालाय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Vidhan Parishad Result वरुन BJP-Shivsena मध्ये जुंपली,पराभवावरुन महायुतीत ब्लेम गेम कसा सुरु झालाय ?
52 117 просмотров · 4 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
52 117 просмотров · 4 ч назад
#BolBhidu #VidhanParishadElectionResult #EknathShinde
पहिलं विधान- शिवसेनेतल्या शकुनीमामांच्या तोंडाला कुलूप लावायची वेळ आली आहे. दुसरं विधान- एकाने प्रामाणिकपणे काम करायचं आणि दुसऱ्याने वेगळा सवतासुभा मांडायचा असा संसार असतो का? शिक्षक, पदवीधरच्या निवडणूक निकालानंतर भाजपच्या नेत्यांची ही दोन्ही विधानं. महायुतीच्या संसारात भांड्याला भांडी लागायला नाही तर चांगलीच वाजायला लागलीयत हेच या दोन विधानांवरुन स्पष्ट होतं. शिक्षक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने ५-० चा विश्वास असलेल्या महायुतीचा ३-२ ने पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीची सरशी होईल अशी परिस्थिती होती. पण गुरुवारी रात्री नागपूरची फायनल मॅच फिरली आणि काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी भाजपचा पराभव करत महायुतीला दणका दिला. आता या पराभवाची कारणं, चिंतन हे सगळं होत राहील पण महायुतीत इन्स्टंटली सुरू झालाय तो ब्लेम गेम. कोणी दगाफटका केला, कोणी कोणाचा गेम केला यावरुन महायुतीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. पण यात दगाबाज ठरवलं जातंय ते शिंदेंच्या शिवसेनेला. शिवसेनेतल्या नेत्यांमुळेच महायुतीचा तिन्ही जागांवर पराभव झाला असंच म्हटलं जातंय. पराभवावरुन महायुतीत ब्लेम गेम कसा सुरू झालाय, पराभवासाठी कोणाला कसं जबाबदार धरलं जातंय, पाहुयात या व्हिडिओमधून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/