Перейти к содержимому

Dahi usal | दही उसळ | Leena's Sugrankatta

Leena's Sugrankatta

0:00 / 0:00

Dahi usal | दही उसळ | Leena's Sugrankatta

12 780 просмотров · 2 мес. назад
Leena's Sugrankatta
53,1 тыс. подписчиков
12 780 просмотров · 2 мес. назад
#cooking #easyrecipe #food #homemade #indianfood #recipe #breakfast #breakfastrecipe #नाश्ता #snacks #dahiusal #usal #healthyfood #healthyeating #उसळ #मटकीचीउसळ #दही #दहीउसळ #पौष्टिकआहार #leenassugrankatta दही उसळ मोड आलेली मटकी २५० ग्रॅम दही १ वाटी पिठीसाखर २-३ चमचे हळद १ चमचा तिखट १ चमचा गोडा मसाला दीड चमचा गूळ लिंबाएवढे मीठ चवीनुसार फोडणीसाठी - तेल, मोहरी, जिरे, हिंग वरुन घालण्यासाठी - बारीक चिरलेला कांदा १ बारीक चिरलेला टोमॅटो १ थोडी कोथिंबीर लिंबू अर्धे वरुन भुरभुरण्यासाठी - तिखट, मीठ, चाट मसाला फरसाण बारीक शेव पातेल्यात तेल गरम करून फोडणी करून घ्यावी. त्यात मटकी घालून हळद, तिखट, गोडा मसाला व मीठ घालून परतावे. पाणी घालून झाकण ठेवून मटकी शिजवून घ्यावी. अधनं मधनं झाकण काढून मटकी हलवून घ्यावी. मटकी शिजत आली की गूळ घालून परत झाकून पाच मिनिटे ठेवावी. पाणी कमी झाले असेल तर परत थोडे पाणी घालावे. उसळ शिजली की गॅस बंद करावा. एका डिशमध्ये उसळ घालावी. वरुन थोडे फरसाण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावी. मीठ, तिखट व चाट मसाला भुरभुरावा. थोडासा लिंबाचा रस घालावा. पिठीसाखर घातलेले गोड दही वरुन घालावे. सर्वात शेवटी शेव घालून थोडी कोथिंबीर घालून दही उसळ सर्व्ह करावी. Video shooting & editing: Varun Damle +91 95459 08040