Перейти к содержимому

PM Modi Speech : 1 वर्षे Gold खरेदी करू नका, पेट्रोल वाचवा, खाण्याचं तेल कमी वापरा, Lockdown लागणार?

BolBhidu

0:00 / 0:00

PM Modi Speech : 1 वर्षे Gold खरेदी करू नका, पेट्रोल वाचवा, खाण्याचं तेल कमी वापरा, Lockdown लागणार?

381 649 просмотров · 5 мес. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
381 649 просмотров · 5 мес. назад
#BolBhidu #NarendraModiSpeech #ModiOnGold "एक काळ असा होता, जेव्हा एखादं संकट किंवा युद्धाची परिस्थिती आली, की लोकं देशहितासाठी आपल्याकडचं सोनं दान करायेच. आज तशा दानाची आवश्यकता नाही, पण तरी आपण पुढच्या वर्षभरात सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणं टाळलं पाहिजे. आपण कोणताही समारंभ किंवा कार्यक्रम असला, तरी सोन्याची खरेदी करायची नाही, असं ठरवलं पाहिजे". हे वक्तव्य आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. रविवारी १० मे च्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी देशाला एक मोठं आवाहन केलं. पुढच्या वर्षभरात सोन्याची खरेदी करू नका, असं मोदी थेट म्हणाले. तसंच लोकांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा, खाण्याचं तेल कमी प्रमाणात वापरावं, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावं, असं आवाहनही मोदींनी केलं आहे. मोदींचं हे वक्तव्य अशा वेळी आलं, जेव्हा सध्या जगभरात युद्धाची परिस्थिती आहे. इराण-अमेरिकेत सिझफायर झालं असलं, तरी युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. मोदींनी अशा परिस्थितीत भारतीयांना सोन्याची खरेदी करू नका, असं म्हटल्यानं अनेकांची चिंता वाढली आहे. मोदींच्या या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातायेत. देश मोठ्या आर्थिक संकटाकडे जातोय का? देशात लॉकडाऊन लागणार का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत. पण पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? त्यांनी भारतीयांना सोन्याची खरेदी करू नका असं आवाहन का केलं? मोदींनी पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा असं का म्हटलंय? याचा अर्थ भारत मोठ्या आर्थिक संकटाकडे जातोय का? सगळा विषय समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/