BJP Candidate List: चर्चा असूनही भाजपनं Nandurbar, Dhule, Raver,Dindori मध्ये उमेदवार का बदलले नाही?
BolBhidu
0:00 / 0:00
BJP Candidate List: चर्चा असूनही भाजपनं Nandurbar, Dhule, Raver,Dindori मध्ये उमेदवार का बदलले नाही?
38 131 просмотр · 2 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
38 131 просмотр · 2 г. назад
#BolBhidu #BJPMaharahstraList #NorthMaharashtra
२००९ च्या लोकसभा निवडणुका झाल्या, निकाल लागला, तेव्हा उत्तर महाराष्ट्रातल्या ५ पैकी ४ जागा भाजपनं जिंकल्या तर एक काँग्रेसनं जिंकली. मग झाल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुका, निकाल लागला, उत्तर महाराष्ट्रातल्या ५ पैकी ५ जागा भाजपनं जिंकल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालातही उत्तर महाराष्ट्रात हाच ५ पैकी ५ जागा भाजप असा निकाल कायम राहिला. थोडक्यात काँग्रेसचा गड समजला जाणारा उत्तर महाराष्ट्र भाजपनं पूर्णपणे कव्हर केला.
पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकांआधी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर बदलली. काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात असलेली अँटी इंकम्बन्सी भाजपला हे मतदारसंघ जिंकण्यात महत्त्वाची ठरली होती. पण मागच्या दोन ते तीन टर्मनंतर यंदाच्या निवडणुकीत हाच डाव भाजपवर उलटेल अशी चर्चा सुरु होती. त्यामुळं भाजप उत्तर महाराष्ट्रात भाकरी फिरवणार का ? असा प्रश्न विचारला जात होता. पण भाजपनं उत्तर महाराष्ट्रातल्या ५ पैकी ४ जागांवर तेच उमेदवार कायम ठेवले आहेत, उत्तर महाराष्ट्रात भाजपनं त्याच उमेदवारांवर डाव का खेळला ? भाकरी फिरवण्याचं गणित कुठं फसलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/