Перейти к содержимому

Trump Tariff चा मोठा धक्का! Canada युरोपच्या जवळ, India वर 100% Tariff चा धोका?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Trump Tariff चा मोठा धक्का! Canada युरोपच्या जवळ, India वर 100% Tariff चा धोका?

17 431 просмотр · 8 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,44 млн подписчиков
17 431 просмотр · 8 часов назад
अमेरिका आणि कॅनडा… जगातले दोन शेजारी देश, NATOचे भागीदार आणि दशकानुदशकांचे मित्र… पण आज हेच दोन देश व्यापाराच्या रणांगणात आमनेसामने उभे आहेत... अमेरिकेचा कॅनडासोबतचा व्यापार संघर्ष तीव्र होत असताना आता युरोपलाही नव्या शुल्काची धमकी दिली जातेय. आणि अशावेळी ट्रम्प यांना टक्कर दिली आहे ती, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लायन यांनी... त्यांनी कॅनडाला युरोपियन युनियनचाचा “सहयोगी सदस्य” किंवा “विशेष भागीदार” बनवण्याची संकल्पना मांडली आहे आणि मैत्रिचा हात पुढे केलाय. तर, दुसरीकडे संतापलेल्या ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी युरोपच्याजवळ जात असताना आता, कॅनडाचा हा निर्णय अमेरिकेविरोधी हेतूने असेल... कॅनडा युरोपियन युनियनशी जवळीक वाढवण्याच्या दिशेनं गेला त्यांची ही कृती “hostile act” म्हणजेच शत्रुत्वाची कृती मानू शकते अशी थेट धमकी दिली आहे आणि भविष्यातील कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळं हा वाद आता केवळ अमेरिका-कॅनडा इथपर्यंत मर्यादित राहिला नसून अमेरिका-कॅनडा-युरोप असा झाला आहे. आणि याच काळात रशियन तेलाच्या मुद्द्यावर भारतावरही अमेरिकेच्या 100 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त टॅरिफ लादण्याचा अधिकार डोनाल्ड ट्रम्प मिळाला आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतानंही याबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांना माय डिअर फ्रेंन्ड असं म्हणत होते आज त्याच मोदींना वाढदिवसाच्या दिवशी हे गिफ्ट मिळालं आहे का?... असा टीका होत आहे. मात्र अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले असताना आता भारताचं युरोपसोबत व्यापाराचं नातं मजबूत होतंय. कॅनडासोबतही व्यापार वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून, अमेरिकेच्या टॅरिफ दबावामुळे भारतासाठी युरोप आणि कॅनडा हे नवे व्यापाराचे दरवाजे ठरू शकतात का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अमेरिकेच्या दबावातून भारतासाठी युरोपचे दरवाजे उघडणार? का हाच सवाल आहे. तेव्हा अमेरिका आणि कॅनडामधला हा वाद आता व्यापारातून राजनैतिक आणि सामरिक पातळीवर पोहोचतोय का? अमेरिकेला कॅनडावर एवढा राग का आहे? कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी ट्रम्प यांच्या दबावाला झुकत का नाहीत? कॅनडा आता अमेरिकेऐवजी युरोपकडे का पाहतोय? अमेरिकेचा भारतावर १०० टक्के टॅरिफ बॉम्ब आदळण्याआधी भारताचा युरोपमधील नवा व्यापार डाव असू शकतो का, आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा भारतासाठी युरोप आणि कॅनडा हे पर्यायी बाजार ठरणार असतील तर, अमेरिकेवरील भारताचं आर्थिक अवलंबित्व भविष्यात कमी होऊ शकतं का? हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. #TrumpTariff #Trump #Canada #EU #EuropeanUnion #MarkCarney #UrsulaVonDerLeyen #India #IndiaUSRelations #IndiaEUFTA #IndiaCanadaTrade #RussiaOil #TariffWar #TradeWar #GlobalTrade #TrumpTariffIndia #100PercentTariff # America and Canada, two neighboring NATO allies and longtime friends, are now locked in a growing trade conflict. As tensions rise, Europe is moving closer to Canada, with EU Commission President Ursula von der Leyen proposing a new “associate member” or special partnership. Donald Trump has warned that such a move could be viewed as a “hostile act.” At the same time, India is facing US tariff pressure over Russian oil, with the possibility of tariffs of up to 100%. So, could Europe and Canada open new trade opportunities for India and help reduce its dependence on the US? Why is Canada moving closer to Europe, and what could this changing global trade equation mean for India? That’s what we’ll explain in this video.