संध्याकाळच्या जेवणाचा हलका फुलका बेत, करायला सोपी खायला टेस्टी Vegetable khichadi recipe
mayuri bhamare
0:00 / 0:00
संध्याकाळच्या जेवणाचा हलका फुलका बेत, करायला सोपी खायला टेस्टी Vegetable khichadi recipe
613 просмотров · 12 дней назад
mayuri bhamare
309 подписчиков
613 просмотров · 12 дней назад
व्हेजिटेबल खिचडी,करायला सोपी - खायला टेस्टी
साहित्य
फोडणीसाठी लागणारे साहित्य
मोठा कांदा -1
टोमॅटो -1
लसूण- 6-7 पाकळ्या
जिरे -1 टेबलस्पून
मोहरी -1 टेबलस्पून
कडीपत्ता
भाज्या
फुलकोबी
बीन्स
बटाटा
गाजर
शिमला मिरची
तांदूळ -2 वाटी
मसाले
काळा मसाला -1.5 टेबलस्पून
लाल मिरची पावडर -1 टेबलस्पून
गरम मसाला - अर्धा टेबलस्पून
हळद - पाव टेबलस्पून
बेडगी मिरची पावडर - अर्धा टेबलस्पून
सर्वप्रथम कुकर मध्ये तेल घालायचे. तेल तापले की त्यामध्ये मोहरी,जिर, कडीपत्ता व लसूण घालायचा. त्यानंतर शेंगदाणे घालायचे व ते परतून घ्यायचे. कांदा घालायचा, कांदा लालसर परतून झाला की टोमॅटो घालायचा. सगळे मसाले घालून घ्यायचे व मसाले चांगले परतून घ्यायचे. 2 वाटी कोलम तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून ते कुकर मध्ये घालायचे आणि 2-3 मिनिटांसाठी मिक्स करून घ्यायचे.जितकी वाटी तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट म्हणजेच 2 वाटी गरम पाणी घालायचे आणि भाज्या पण आहेत म्हणून अर्धा वाटी थोड पाणी अजून घालायचं. मीठ घालायचं, भरपूर कोथिंबीर घालायची व मॅगी मसाला घालायचा.झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायचा. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर झाकण काढायचे. सुटसुटीत आणि मऊसर अशी व्हेजिटेबल खिचडी तयार आहे.