Перейти к содержимому

लवंग लतिका । Lavang Latika Recipe | बंगालची सुप्रसिद्ध मिठाई आता घरच्या घरी बनवा | Recipe in Marathi

Gharcha Swaad

0:00 / 0:00

लवंग लतिका । Lavang Latika Recipe | बंगालची सुप्रसिद्ध मिठाई आता घरच्या घरी बनवा | Recipe in Marathi

43 818 просмотров · 7 л. назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
43 818 просмотров · 7 л. назад
How To Make Lavang Latika At Home | लवंग लतिका | Bengali Sweets Recipe | Lavang Lata | Step By Step Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   Buy Meyer Pans: http://bit.ly/2DFyOBX [ Use Code: GS15 ] and get 15% Discount साहित्य - २५० ग्रॅम मावा, ४५० ग्रॅम मैदा, १५ ग्रॅम काप केलेले काजू, १५ ग्रॅम काप केलेले बदाम, १५ ग्रॅम काप केलेले पिस्ता, १५ ग्रॅम काप केलेले अक्रोड, १५ ग्रॅम मनुका, १ tblsp चारोळी, १¼ tsp वेलदोडे आणि जायफळ पावडर, २०० ग्रॅम साखर, ८० ग्रॅम पीठी साखर, ५० ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खीस, टोचण्यासाठी लवंगा, चिमुटभर केसर, ½: दालचिनीचा तुकडा, ½ कप तूप किंवा डालडा, चवीनुसार मीठ आणि तळण्याकरिता तेल. कृती - प्रथम एका पॅनमध्ये तूप फक्त वितळून घ्या. परातीत मैदा चाळणीने चाळून घ्या. मैद्यात वितळलेले तूप घाला, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा. आता यात थोडे थोडे साधे पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्या. पिठाचा गोळा हा जास्त घट्ट किंवा सैल नाही होणार याची काळजी घ्या. आता पॅनमध्ये मंद आचेवर मावा लुसलुशीत भाजून घ्या. यात सुक्या खोबऱ्याचा खीस घालून १ मिनिटं परतून घ्या. माव्याच्या मिश्रणाला बाजूला काढून थंड करून घ्या. आता याच पॅनमध्ये सर्व सुका मेवा ( मनुका सोडून ) खमंग भाजून घ्या. थंड झालेलं माव्याचे मिश्रण या भाजलेल्या सुक्या मेव्यात घाला. सोबत पिठीसाखर, १ tsp वेलदोडे आणि जायफळ पावडर घाला. संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. ( सारणाचे मिश्रण एकजीव करताना गॅस बंद ठेवावा. ) आता एका भांड्यात साखर घाला. साखरेच्या वर पाणी घाला. यात केसर ¼ tsp वेलदोडे आणि जायफळ पावडर, केसर, दालचिनीचा तुकडा घालून मध्यम आचेवर २ तारी पाक तयार करून घ्या. पाक तयार झाल्यावर त्याला रूम टेम्परेचवर आणा. आता मुरवत ठेवलेल्या पिठाला एकदा चांगलं मळून घ्या. पिठाच्या पुरी इतक्या पाऱ्या लाटून घ्या. वरील व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे सारण भरून लवंग लतिका तयार करून घ्या. आता लवंग लतिका मंद आचेवर तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेल्या लवंग लतिका थंड झाल्या कि पाकात घोळून घ्या. या लवंग लतिका तुम्ही ५/६ दिवस साठवून खाऊ शकता. धन्यवाद ! #lavanglatika #bengalisweetrecipe #lavanglatikainmarathi If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   Follow Us On Facebook 👉   / gharcha.swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com